न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ एप्रिल २०२०) :- जगभरात धुमाकुळ घालणाऱ्या जीवघेण्या करोना व्हायरसचा प्रादुर्भाव देशात दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यातील करोनाबाधितांचा व यामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडाही वाढत आहे.
पुण्यात आज सकाळपासून पाच जणांचा करोनाने बळी घेतला आहे. शहरातील करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता १३ वर पोहचली आहे. सकाळापासून शहरातील नायडू रुग्णालयात -१, नोबेल रुग्णालयात – १ आणि ससून रुग्णालयात ३ अशी एकूण ५ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी याबाबत माहिती दिली आहे.
पुणे शहरात आज अखेर १५६७ नागरिकांनी करोनाची तपासणी केली असून त्यापैकी १४१७ नागरिकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहे. तर १५८ रुग्ण बाधित आढळले आहेत. तसेच या दरम्यान १७ जणांना घरी सोडण्यात आले आहे. तर आज अखेर शहरात एकूण १३ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच इतर रुग्णांची तब्येत ठणठणीत असल्याचे आरोग्य विभाग मार्फत सांगण्यात आले













