न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ एप्रिल २०२०) :- अत्यावश्यक सेवा पुरवित असताना दररोज वेगवेगळ्या लोकांशी संपर्क येतो, त्यामुळे खबरदारी म्हणून सर्व औषध विक्रेते व कर्मचाऱ्यांची पालिकेतर्फे मोफत तपासणी करण्यात यावी, अशी मागणी केमिस्ट असोसिएशन ॲाफ पुणे डिस्ट्रीक्टचे उपाध्यक्ष विवेक तापकीर यांनी पत्राद्वारे आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर औषध विक्रेते अत्यावश्यक सेवा सुरळीतपणे पुरवित आहेत. प्रशासनाची यासाठी चांगली मदत होत आहे. अत्यावश्यक सेवा पुरवित असताना औषध विक्रेत्यांची सुद्धा तपासणी करणे गरजेचे आहे.
तसेच अविरत सेवा पुरवठा करण्यासाठी खबरदारी म्हणून सरसकट सर्व औषध विक्रेत्यांची कोरोना (कोविड-19) तपासणी करावी, अशी मागणी विवेक तापकीर यांनी केली आहे.













