न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ एप्रिल २०२०) :- निजामुद्दीन येथील धार्मिक कार्यक्रमावरून परतलेल्या ३२ जणांची यादी केंद्र सरकारने पिंपरी चिंचवड महानगर पालिका आणि पोलिसांना पाठविली. ३२ पैकी २२ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र उर्वरित दहा जणांचा शोध लागत नव्हता. हे दहाजण कुठे आहेत याचा शोध घेतला असता ते पिंपरी चिंचवड शहरात नसल्याचे समजले.
ते तबलिगी ज्या शहरात आहेत, तेथील प्रशासनाला पिंपरी चिंचवड महापालिकेने कळविले आहे. त्या दहाही जणांना संबंधित प्रशासनाने ताब्यात घेतले आहे. करोनाची लागण झालेल्यां नऊ जणांपैकी एकजण खडकी कॅन्टोमेन्ट बोर्डाच्या हद्दीतील आहे. यामुळे शहरातील करोना बाधितांची सध्याची संख्या आठ व आज एक रुग्ण वाढला आहे. त्यामुळे ही संख्या नऊवर पोहोचली आहे.













