न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ एप्रिल २०२०) :- पिंपरी येथील भाजी मंडईची पहाटे ३ ते सकाळी ७ ही वेळ सध्या निश्चित करण्यात आली आहे. या वेळेत भाजी घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांचे प्रमाण अत्यल्प आहे. या वेळेत येऊन शहरात वेगवेगळ्या ठिकाणी भाजी विक्री करणारे विक्रेते होलसेल दरात भाजी घेऊन जातात.
त्यामुळे पिंपरी येथील भाजी मंडईत भाजी खरेदी करण्यासाठी नागरिकांनी गर्दी करू नये. त्या ऐवजी घराजवळील भाजी विक्रेत्यांकडूनच भाजी खरेदी करावी. पिंपरीत भाजी खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी होत असल्याने सध्या भाजी विक्रीची वेळ मर्यादित केलेली आहे, अशी माहिती लालबहादूर शास्त्री भाजी मंडईचे अध्यक्ष सुनील कुदळेयांनी दिली आहे.












