- तर, राज्याचा करोनाबाधितांचा मृत्यूदर ६ टक्के…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ एप्रिल २०२०) :- महाराष्ट्रातल्या करोना बाधितांची संख्या ११३५ वर पोहचली आहे अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी जनतेशी संवाद साधला. आजपर्यंत १२० जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
राज्यात करोनाबाधितांचा मृत्यूदर ६ टक्के आहे. हा दर सरासरीपेक्षा जास्त आहे असंही ते म्हणाले. सध्या राज्यातील मृत्यूदर वाढला आहे. राज्यातील मृत्यू दर सहा टक्क्यांपर्यंत गेला आहे. तो सरासरी मृत्यूदरापेक्षा अधिक आहे. काल पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतही यावर चर्चा झाली असल्याची माहिती टोपे यांनी दिली.
करोनानं ग्रासलेले वयोवृद्ध व्यक्ती तसंच मधुमेह, किडनी, हृदयाचे त्रास असलेले व्यक्ती ज्यांना करोना झाला त्यांचं मृत्यूचं प्रमाण ९५ टक्के आहे. आपल्याला मृत्यूदर कमी करायचा आहे, असंही त्यांनी नमूद केलं.इतर देशांच्या तुलनेत आपल्या देशातली परिस्थिती नियंत्रणात आहे असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. मात्र असं असलं तरीही काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे असंही ते म्हणाले.












