- शहरातील कोरोना बाधितांचा आकडा पोहोचला २२ वर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ एप्रिल २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात बुधवारी एका रुग्णाचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर आज गुरुवारी सकाळी पुन्हा एका रुग्णाचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे शहरातील एकूण करोना बाधितांचा आकडा २२ वर गेला आहे. त्यातील पहिले बारा रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर सध्या शहरातील दहा रुग्णांवर महापालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
बुधवारी (दि. ७) दिल्लीतून आलेल्या रुग्णांच्या हाय रिस्क कॉन्टॅक्ट मध्ये आलेल्या एका रुग्णाला करोनाची लागण झाल्याचे समोर आले. त्या रुग्णावर वायसीएम रुग्णालयात उपचार सुरु असून त्याचा हाय रिस्क कॉन्टॅक्टमध्ये आलेल्यांनाही रुग्णालयात दाखल केले आहे.
आज एका महिला रुग्णाची भर पडली आहे. या महिलेचा तपासणी अहवाल रात्री उशीरा आला असून त्यामध्ये ती पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. महापालिकेच्या वतीने या महिलेच्या हाय रिस्क कॉन्टॅक्टमध्ये आलेल्या व्यक्तींचा शोध घेतला जात आहे.












