नागरिकांनी घराबाहेर पडू नये; आमदार लांडगे यांचे आवाहन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ एप्रिल २०२०) :- भोसरीगांव शुक्रवार, शनिवार आणि रविवारी या तीन दिवस पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. गावकऱ्यांनी एकमताने हा निर्णय घेतला आहे. शहरात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. भोसरी परिसरात देखील कोरोनाचे काही रुग्ण सापडले आहेत. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी भोसरीकरांनी एकमताने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या काळात अत्यावश्यक वगळता भाजीपाल, किराणा माल, दूध तसेच जीवनावश्यक वस्तूंची दुकाने बंद राहणार आहेत.
दरम्यान, शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे खबरदारी घेणे आवश्यक आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी भोसरीगाव बंद ठेवण्यात येणार आहे. शक्रवार, शनिवार आणि रविवारी असे तीन दिवस पूर्णपणे भोसरीगाव लॉकडाऊन करण्यात येणार आहे. या निर्णयाला गावकऱ्यांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे नागरिकांनी या निर्णयाचे पालन करावे, कोणीही घराबाहेर पड़ नये. या काळात सर्व दुकाने बंद राहतील. सर्वानी प्रशासनास सहकार्य करावे व घराबाहेर पडू नये, असे आवाहन आमदार महेश लांडगे यांनी केले आहे.













