न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ एप्रिल २०२०) :- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. हे आदेश गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त आर. आर. पाटील यांनी दिले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये मास्क वापरणे हेदेखील अनिवार्य करण्यात आले आहे. शासनाच्या वतीने दिलेल्या सूचनांचे, निर्देशांचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर भारतीय दंड विधान संहिता कलम १८८ प्रमाणे, आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम ५१ ते ६० नुसार, साथीचे रोग कायदा १९९७ तसेच प्रचलित कायद्यातील तरतुदीनुसार कायदेशीर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.













