न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० एप्रिल २०२०) :- पुण्यात करोनाग्रस्तांची संख्या दिवसागणिक वाढतच आहे. आज आणखी १५ करोनाग्रस्त रूग्णांची त्यात भर पडली आहे. या १५ पैकी ११ जणांवर नायडू रूग्णालयात तर चार जणांवर ससून रूग्णालयात उपचार सुरू आहेत. आज १५ रुग्णांची भर पडल्यामुळे पुणे शहरातील रूग्णांची संख्या १९० झाली आहे तर जिल्ह्यातील रूग्णांची संख्या २२५ झाल्याची माहीत महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
दरम्यान, महाराष्ट्रात १६ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातल्या करोनाग्रस्तांची संख्या ही १३८० झाली आहे. एएनआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे. यापैकी ११७ जण करोना बाधित रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतल्याचं आरोग्य विभागानं म्हटलं आहे.













![[ब्रेकिंग न्यूज] लाचखोरीच्या आरोपानंतर मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे निलंबित!...](https://newspcmc.com/wp-content/uploads/2026/11/Screenshot_20261104_200149_Google-190x122.jpg)




