न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० एप्रिल २०२०) :- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. संचारबंदी लागू असताना कोणत्याही नागरिकाला घराबाहेर पडण्याची परवानगी नाही. गुरुवारी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत १३४ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
यात आळंदी ०९, हिंजवडी ३०, देहूरोड १९, एमआयडीसी भोसरी ०२, भोसरी १८, चाकण २०, दिघी ३०, तळेगाव दाभाडे ०६ अशा एकूण १३४ जणांवर गुरुवारी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.












