- कोरोना रोखण्यासाठी नागरिकांनी घरातच रहावे, पण जागरुक रहावे – डॉ. संतोष बारणे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० एप्रिल २०२०) :- पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील मोशी गावच्या नजीकच्या गावांमध्ये करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आज शुक्रवारी दि. १० एप्रिल च्या मध्यरात्रीपासून मोशीगाव (दि. ११, १२, १३ व १४ एप्रिल २०२०) रोजीपर्यंत चार दिवस पुर्णता: बंद करण्यात येणार आहे, असा निर्णय मोशीतील ग्रामस्थांनी घेतला आहे.
या बंदमध्ये भाजीपाला, किराणामाल, दुध, तसेच जिवनावश्यक वस्तुंची दुकाने बंद राहणार आहेत. मोशी व परिसरातील नागरिकांनी, व्यापारी, दुकानदार यांनी पोलिस प्रशासनास सहकार्य करावे व सर्वानी घरात रहावे, असे आवाहन देखील ग्रामस्थांनी केले आहे.
याबाबत बोलताना मोशीचे ग्रामस्थ आणि उद्योजक डॉ. संतोष बारणे म्हणाले की, महाराष्ट्रात पुण्यासह पिंपरी चिंचवड शहरावर कोरोनाचे भीषण सावट आहे. पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाचे अद्यापपर्यंत २४ रुग्ण आढळले आहेत. त्यात बारा रुग्ण बरे झाले असून, त्यात आणखी १२ रुग्णांची भर पडलेली आहे. शहरातील वायसीएम व नवीन भोसरी रुग्णालय आणि शहरातील खासगी रुग्णालयात हे रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामुळे शहरात संचारबंदी लागू आहे. मात्र, तरीही शहरातील काही नागरिक जीवनावश्यक वस्तूंचा दिखावा करीत, शहरातील रस्त्यावर मुक्त संचार करीत आहेत. याचं कारणामुळे चिखली, भोसरी परिसरातील ग्रामस्थांनी सलग तीन दिवस गाव बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या गावांच्या पंचक्रोशीतच असणारे मोशी हे देखील गाव आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांनी देखील मोशीगाव उद्यापासून शनिवार ते मंगळवार (दि. ११, १२, १३ व १४ एप्रिल २०२०) पर्यंत कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या दरम्यान जीवनावश्यक वस्तूंची सर्व दुकानं बंद राहणार असून, लॅब, मेडीकल व हॉस्पिटल्स चालु राहतील. नागरिकांनी घाबरु नये, पण जागरुक रहावे. अशा गोष्टींचा अवलंब केला तरच, आपण कोरोना विषाणूपासुन सुरक्षित राहू, असे डॉ. बारणे यांनी यावेळी म्हणाले.


















