- गाव बंदच्या काळात नागरिकांनी घराबाहेर पडू नये – दिनेश यादव…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० एप्रिल २०२०) :- कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी चिखली कुदळवाडीतील ग्रामस्थांनी तीन दिवस गाव बंद करण्याचा निर्णय घेतला असून आजपासून (शुक्रवार) त्याची अंमलबजावणी करण्यात आली आहे.
पिंपरी चिंचवड शहरात कोरोना रुग्णांमध्ये वेगाने वाढ होताना दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर चिखली-कुदळवाडी गावातील ग्रामस्थांनी हा निर्णय घेतला असून या तीन दिवसात रुग्णालय आणि मेडिकल वगळता सर्वच दुकाने बंद असणार आहेत.
यासंदर्भात बोलताना स्वीकृत सदस्य दिनेश यादव म्हणाले की, कोरोना आपल्या दारात येऊन ठेपला आहे. मात्र तो घरात येऊ नये यासाठी आता सर्वांनी सावध राहणे आवश्यक आहे. त्यामुळे गाव बंदच्या काळात नागरिकांनी घराबाहेर पडू नये. तसेच प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या सूचनांचे व नियमांचे पालन करावे असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे.
यावेळी युवराज पवार,गणेश यादव,संभाजी बालघरे उपस्थित होते.


















