- आज सायंकाळपर्यंत आणखी दोन रुग्णांची भर; रुग्णसंख्या पोहोचली २६ वर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० एप्रिल २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात करोनाग्रस्तांची संख्या दिवसागणिक वाढतच आहे. आज शुक्रवारी (दि. १०) रोजी आणखी दोन करोनाग्रस्त रूग्णांची त्यात भर पडली आहे.
आज दोन रुग्णांची भर पडल्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील रूग्णांची संख्या २६ झाली आहे. तर यापैकी १२ करोना बाधित रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे शहरात १४ कोरोना बाधित रुग्ण सक्रीय आहेत. या सर्वांवर वायसीएम रूग्णालयात उपचार सुरू आहेत.


















