न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० एप्रिल २०२०) :- कोरोना विषाणूने संपूर्ण जगासह भारताला हादरून टाकले आहे. कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, लाखो लोकांना लग्न झाली आहे. भारतात गेल्या ४८ तासांत कोरोनाचे एकूण १ हजार ४८७ नव्या रुग्ण आढळून आले आहेत. तर, केवळ २४ तासांत एकूण ८९६ नव्या रुग्णांची भर पडली असून कोरोनामुळे ३७ लोकांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याची माहिती दिली आहे.
जगभरात कोरोनाबाधीतांची संख्या १५ लाख ९६ हजार ४९६ वर पोहचली आहे. यांपैकी ९५ हजार ५०५ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, ३ लाख ५४ हजार ६ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याची माहिती समोर आली आहे. भारतही आता कोरोना विषाणूच्या जाळ्यात अडकत चालला असल्याची चिन्ह दिसू लागली आहे.
भारतात आतापर्यंत एकूण ६ हजार ७६१ कोरोना बाधीत आढळले आहेत. त्यांपैकी १९९ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, ५१६ लोक कोरोनामुक्त झाले आहेत. भारतात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनाबाधीतांची संख्या १३८० वर पोहचली आहे. यात ७२ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, ११७ रुग्ण कोरोना विषाणूच्या जाळ्यातून बाहेर आल्याचे समजत आहे.


















