न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० एप्रिल २०२०) :- राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. नागरिक संचारबंदितही तीन फुटांचे सुरक्षित अंतर न राखता गर्दी करीत होते. त्यामुळे कोरोना विषाणूचा फैलाव होऊ नये, गर्दी होऊ नये म्हणून पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने पिंपरीतील लाल बहाद्दुर शास्ञी मंडईतील अनधिकृत गाड्यांवर कारवाई केली. त्यामुळे परिसर मोकळा झाला आहे.
भविष्यात अतिक्रमण होऊ नये, म्हणून महापालिकेने मंडईच्या चारही बाजुने येणारे रस्ते डिव्हायडरद्वारे खांब लावून कायमस्वरुपी बंद केले आहेत. त्यामुळे केवळ एकच व्यक्ती मंडईत प्रवेश करू शकतो. तसेच मुख्य मंडईकडे येणारा रस्ता, शगुन चौकातुन येणारा रस्ता, तसेच फळ मार्केटकडे येणारा रस्ता व पिंपरी पोलीस चौकी, पिंपरी रेल्वे स्टेशन समोरचा रस्ता असे चारही बाजुने रस्ते बंद केले आहेत. त्यामुळे भविष्यात मंडईत कोणतीही गर्दी होणार नाही, अतिक्रमण होणार नाही अशी योजना महापालिकेने केली आहे.


















