न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० एप्रिल २०२०) :- कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाच्या नियंत्रणास्तव पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात आपत्कालीन उपाययोजना लागू करण्याची व त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
त्यामुळे महापालिकेने आज शुक्रवारी (दि. १०) रोजी याकामी चांदणी चौक (पी.एम.टी. चौकाजवळ), भोसरी (पुजा टुर्स अँण्ड ट्रॅव्हल्स – भोसरी मेन रोड – मॅन्जिनिस केक शॉप – मेघना सोनोग्राफी सेंटर – लांडेवाडी रोड – पि चिं मनपा भोसरी करसंकलन कार्यालय – भगवान गव्हाने चौक – लोंढे गिरणी – विनय सुपर मार्केट – आई तुळजा भवानी मंदीर – मारुती मंदीर – पुजा टुर्स अँण्ड ट्रॅव्हल्स)
क्रांतीवीर नगर, थेरगांव गावठाण मधील (रहाटणी लिंक रोड वरील स्वस्तिक डायमंड आपार्टमेंट – रहाटणी लिंक रोड – आस्था मेडिकल स्टोअर – तेथुन आत हॉटेल सिल्वर ९ कडे जाणारा रोड – हॉटेल सिल्वर ९ – ए विंग एस ऑरा सोसायटी – रहाटणी लिंक रोड वरील स्वस्तिक डायमंड आपार्टमेंट)
तसेच डांगे चौक ते आदीत्य बिर्ला रुग्णालय चौक ते तापकीर चौक ते काळेवाडी फाटा चौक ते डांगे चौक या चौका दरम्यान असलेल्या रस्त्यांवरील आवागमन फक्त अत्यावश्यक सेवांकरिता चालु ठेवले आहे.
दिघी गावठाण स्कायलाईन सोसायटीच्या चतु:सीमा (हॉटेल द्वारकाधीश – ओम सुपर मार्केट – फेज ३ रोड – ओम साई नर्सरी – श्री. साई हॉस्पिटल – हॉटेल द्वारकाधीश) हा भाग आज शुक्रवार, दि.१० एप्रिल, २०२० रोजी रात्री ११.०० वाजलेपासून पुढील आदेशापर्यंत सील करणेचे आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत.
तसेच सदर परिसरातील संबंधित पोलिस स्टेशन प्रमुख यांचे मार्फत सदर भागाच्या हद्दी सील करणे आवश्यक आहे. तसेच सदर परिसरांच्या हद्दींमध्ये पुढील आदेशापर्यंत प्रवेशबंदी व परिसरातून बाहेर पडण्यास नागरिकांना बंदी करणे, सील केलेल्या परिसरातील प्रत्येक नागरिकाने तोंडाला मास्क लावणे बंधनकारक केले आहे.


















