- याशिवाय बोलताना तसेच श्वासोश्वास करतानाही होतो कोरोनाचा फैलाव…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० एप्रिल २०२०) :- भारतात सध्या सर्वचजण करोना व्हायरसमुळे चिंतेत आहेत. उष्ण वातावरणात करोना व्हायरस जिवंत राहत नाही, असे म्हटले जाते. त्यासंबंधी अमेरिकेतील प्रतिष्ठीत शास्त्रज्ञांच्या पॅनलने एक महत्वपूर्ण निष्कर्ष काढला आहे.
भारताच्या दृष्टीने हा निष्कर्ष अत्यंत महत्वाचा आहे. कारण भारतात उन्हाळा सुरु झाला असून, दररोज उकाडा वाढत आहे. भारतीय नागरिकांचे असे मत आहे की, तापमान वाढल्यानंतर करोना व्हायरस निघून जाईल किंवा त्याचा फैलाव बंद होणार नाही. मात्र चीन, युरोपपेक्षा ऑस्ट्रेलिया, इराण या देशांमध्ये जास्त तापमान असूनही तिथे करोनाचा फैलाव वेगाने होत आहे. त्यामुळे भारतीयांना व्यक्तीगत सुरक्षा आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावेच लागेल, असे या पॅनलने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे.
बोलताना तसेच श्वासोश्वास करतानाही Covid-19 चा फैलाव होतो, असे अमेरिकेतील नॅशनल अॅकेडमीस ऑफ सायन्सच्या या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. त्यामुळेच मुंबईत मास्क बंधनकारक करण्यात आले आहे.













![[ब्रेकिंग न्यूज] लाचखोरीच्या आरोपानंतर मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे निलंबित!...](https://newspcmc.com/wp-content/uploads/2026/11/Screenshot_20261104_200149_Google-190x122.jpg)




