न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ एप्रिल २०२०) :- येत्या १४ एप्रिल २०२० रोजी २१ दिवसांचे लॉक डाऊन ची अंतिम तारीख संपत आहे. परंतु ह्या २१ दिवसात कोरोना विषाणू बाधितांचा आलेख हा वाढतच चाललेला दिसून येत आहे. राज्यातील कोरोना बाधितांची संख्या १५०० च्या वर गेलेली आहे. येत्या १० दिवसात हा आकडा मोठ्या संख्येने वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सर्वात धोकादायक म्हणजे पुणे आणि मुंबई या दोनही शहरातील बधितांची संख्या १२०० च्या जवळपास आहे. म्हणजेच काय तर राज्यातील ७५ टक्के रुग्ण ह्या दोन महानगरांमध्येच आढळून आलेले आहेत. सध्या तपासणी करीत असलेल्या रुग्णांमध्ये कोणत्याही प्रकारची लक्षणे आढळून येत नाहीत. अश्या सायलेंट कॅरिअर रुग्णामुळे कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे आणि दुर्दव्याची गोष्ट म्हणजे कोरोनाच्या तिसऱ्या स्टेज ला म्हणजेच कम्युनिटी स्प्रेड ला सुरुवात झाली आहे.
त्यामुळे येत्या पुढील काळात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढणार यात शंका नाही. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनी कडक पावले उचलणे आवश्यक असून. लॉकडाऊन पुढील काळासाठी वाढवून सक्तीची काही बंधने नागरिकांची जीवितहानी टाळण्यासाठी घालावी लागणार आहेत. तसेच आयुक्त, जिल्हाधिकारी ह्या जबाबदार प्रमुखांना त्याची अंमलबजावणी कडक पद्धतीने राबवावी लागणार आहे. त्याशिवाय कोरोना लढा जिंकता येणार नाही.
जोपर्यंत कोरोना विषाणू प्रतिबंधक लसीची निर्मिती होत नाही तोपर्यंत राज्याला व देशाला फार मोठी काळजी घेणे क्रमप्राप्त ठरते. हा लढा दीर्घकाळ म्हणजेच १५ महिन्यांपेक्षा जास्त काळ भारतास किंबहुना जगास लढावा लागणार आहे. त्यासाठी सद्यस्थितीत लॉक डाऊन हेच प्रभावी अस्त्र ठरणार आहे. “स्टे अँट होम” मुळेच विषाणूचे संक्रमण रोखता येणार आहे. त्यामुळे टप्प्या टप्याने म्हणजेच “फाईव्ह फेज प्रणाली” वापरूनच लॉक डाऊन हटवावे. अन्यथा राज्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील.
पुणे आणि मुंबई या दोन्ही महानगरांमध्ये घनदाट वस्त्यांमध्ये कोरोनाने शिरकाव केलेला आहे. त्याचप्रमाणे बळींची संख्याही वाढलेली आहे. अश्या परिस्थितीतही नागरिक लॉक डाऊनचे पालन पूर्णतः करताना दिसून येत नाहीत. मंडई, बाजारपेठात नागरिकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. संध्याकाळच्या वेळेत प्रमुख चौकात खरेदीच्या नावाने सोशल डिस्टन्स चा सध्या फज्जा उडत आहे. अश्या वातावरणात प्रशासनाने आता कडक धोरण अवलंबणे गरजेचे आहे. त्यासाठी लॉकडाऊन हे योग्य पद्धतीनेच काढणे योग्य ठरेल. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या दिशानिर्देशांचे पालन काटेकोरपणे पाळणेच योग्य ठरेल. माननीय मुख्यमंत्र्यांनी याबाबत कठोर निर्णय घेण्याचीच ही वेळ आहे. “फाईव्ह फेज प्रणाली” मध्ये बाधितांच्या संक्रमित विभागाचा ग्राफिक आराखडा तयार करून “हॉट स्पॉट झोन” ते “लोअर स्प्रेड स्पॉट झोन” असे वर्गीकरण करूनच टप्प्या टप्प्याने लॉक डाऊन हटवावे. तरच ह्या कोरोना लढ्या विरुद्ध विजय मिळवू शकू.
– विजय व पाटील :- अध्यक्ष, प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समिती













![[ब्रेकिंग न्यूज] लाचखोरीच्या आरोपानंतर मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे निलंबित!...](https://newspcmc.com/wp-content/uploads/2026/11/Screenshot_20261104_200149_Google-190x122.jpg)




