- संचारबंदी कालावधीसाठी पोलिसांना महिद्रा कंपनीकडून दहा वाहनांसह मिळाले चालकही…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ एप्रिल २०२०) :- शहरात संचारबंदी लागू झाल्यामुळे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाला वाहनांची कमतरता भासत होती. त्यामुळे पोलिसांना संचारबंदीची अंमलबजावणी करताना अडचणी येत होत्या. ही निकड जाणून महिद्रा कंपनीने तात्पुरती दहा वाहनं चालकांसह आयुक्तालयाला दिली आहेत.
शहरात जवळपास ८० पेक्षा अधिक ठिकाणी पोलिसांकडून नाकाबंदी सुरु आहे. मात्र पोलिसांकडे सध्या असलेल्या वाहनांची संख्या कमी आहे. त्यामुळे पोलिसांना शहरात नाकाबंदी, गस्तीसाठी मर्यादा येत होत्या. ही कमतरता महिंद्रा कंपनीने भरून काढली आहे, त्यांनी चालकांसह दहा वाहने संचारबंदीच्या कालावधीसाठी पोलीस आयुक्तालयाला नुकतीच दिली आहेत, अशी माहिती पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी दिली.















