न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ एप्रिल २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरातील सक्रीय कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या १९ झाली आहे. पिंपरी चिंचवड शहरात आज एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
शहरामध्ये आजपर्यंत एकुण ३१ रुग्ण पॉझिटीव्ह आढळून आलेले आहेत. या पैकी १२ रुग्ण पुर्णपणे बरे होऊन घरी गेले आहेत. उर्वरित १५ रुग्ण महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात व तीन रुग्ण पुण्यातील रुग्णालयात दाखल असून, रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. त्यांचेवर आयसोलेशन कक्षामध्ये उपचार सुरु आहेत.
शनिवारी ४१ वर्षीय पुरुषाचे रिपोर्ट ‘पॉझिटीव्ह’ आले आहेत. त्यामुळे त्याला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. गुरुवारी (दि. ९) पॉझिटीव्ह आलेल्या रुग्णाच्या ‘हाय रिस्क कॉन्टॅक्ट’मधील हा रुग्ण आहे. तसेच आज रविवारी पिंपरी-चिंचवड शहरात वास्तव्याला असलेल्या आणि पुण्यातील एका नामांकित खासगी रुग्णालयात नोकरीला असलेल्या नर्सच्या पतीला देखील लागण झाली आहे. या नर्सच्या पतीचा कोरोना रिपोर्ट आज (रविवारी) पॉझिटीव्ह आला आहे.















