- तर, पुण्यात आज दोन करोनाबाधितांचा मृत्यू …
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ एप्रिल २०२०) :- आता काही वेळापूर्वीच हाती आलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात ३५२ पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने महाराष्ट्रात २३३४ इतकी कोरोनाग्रस्तांची संख्या झाली आहे.
महाराष्ट्राच्या काळजीत भर घालणारीच ही बातमी आहे. कारण देशभरात सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. करोनामुळे ११ जणांचा मृत्यूही झाला आहे. महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.
तसेच पुण्यात करोनाबाधितांसह मृत्यूंची संख्या वाढत आहे. आज शहरात करोनाने दोन बळी घेतले. याचबरोबर करोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा ३४ वर पोहचला आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये नाना पेठेतील ४० वर्षीय पुरूषासह कोंढवा खुर्द येथील ५० वर्षीय महिलेचा समावेश आहे. या दोघांनाही अन्य आजार देखील होते, अशी माहिती आरोग्य विभागाकडून मिळाली आहे.


















