न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ एप्रिल २०२०) :- फिर्यादी चित्राबाई यांचे महात्मा फुले नगर येथे किराणा मालाचे दुकान आहे. रविवारी दुपारी आरोपी त्यांच्या दुकानात साहित्य खरेदी करण्यासाठी आले होते. त्यांनी लवकर साहित्य दिले नाही, कारणावरून संतापलेल्या आरोपींनी फिर्यादी चित्राबाई यांच्या पतीच्या तोंडावर लोखंडी रॉडने, त्यानंतर फिर्यादी चित्राबाई व त्यांचा मुलगा सिद्धोधन यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.
ही घटना महात्मा फुले नगर, भोसरी येथे रविवारी दुपारी घडली. सनी बबन वाघमारे, गण्या (पूर्ण नाव माहिती नाही), सूरज शर्मा, अक्षय नागप्पा कांबळे (सर्व रा. महात्मा फुले नगर, एमआयडीसी, भोसरी) अशी आरोपींची नावे आहेत. चित्राबाई बाबुराव कांबळे (वय ४५) असे जखमी महिलेचे नाव असून त्यांनी रविवारी (दि. १२) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.












