- सक्रीय आकडा २४ वर तर, आजपर्यंत एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ३७ वर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ एप्रिल २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात सोमवारी (दि. १३) रोजी दिल्लीतील तबलीगीच्या कार्यक्रमातून आलेल्याच्या हाय रिस्क कॉन्टॅक्टमधील एका २३ वर्षीय आणि दुसऱ्या ४८ वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
त्यामुळे शहरात कोरोनाचे आणखी दोन रुग्ण वाढले आहेत. दुसरा रुग्ण कोणाच्या संपर्कात आला होता, त्यांची हिस्ट्री काय आहे, याची माहिती काढण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे. शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या २४ झाली आहे. त्यामुळे आजपर्यंत ३७ जणांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील १२ जण कोरोनामुक्त झाले आहेत तर, एकाचा मृत्यू झाला आहे.


















