- नगरसेवक शैलेश मोरे यांचे समाजबांधवांना आवाहन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ एप्रिल २०२०) :- जगावर व आपल्या देशावर कोरोनाचे अति महाभयंकर संकट ओढवलं आहे. पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाच्या भयंकर संकटावर मात करण्यासाठी लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू आहे.
आज १४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करताना अनुयायांनी प्रशासनाला सहकार्य करावे. संचारबंदीचे कठोरपणे पालन करावे. जयंती साजरी करण्यासाठी समाज बांधवांनी रस्त्यावर येऊ नये. बाबसाहेबांना घरातच वंदन करून व अभिवादन करून जयंती साजरी करावी.
बाबासाहेबांनी लिहलेल्या कायद्याचे उल्लंघन होणार नाही. बाबासाहेबांनी लिहलेल्या कायद्याचा अपमान होणार नाही. आपले व आपल्या समाजाचे नाव बदनाम होणार नाही, असे कोणतंही कृत्य आपल्या समाजबांधवांनी करू नये. हेच आपले महामानवास अभिवादन आहे, अशी शपथ घेऊ, असे आवाहन नगरसेवक शैलेश मोरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी समाजबांधवांना केले आहे.


















