न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ एप्रिल २०२०) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त महापौर उषा ऊर्फ माई ढोरे यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
आज सकाळी महानगरपालिका प्रशासकीय भवनात झालेल्या या कार्यक्रमास उपमहापौर तुषार हिंगे, पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे आदी उपस्थित होते.
त्यानंतर पिंपरी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्यास महापौर उषा ऊर्फ माई ढोरे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी उपमहापौर तुषार हिंगे, पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, नगरसदस्य विलास मडिगेरी आदी उपस्थित होते.
तसेच एच.ए.कॉलनी, पिंपरी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासही महापौर उषा ऊर्फ माई ढोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपमहापौर तुषार हिंगे, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, पक्षनेते नामदेव ढाके आदी उपस्थित होते.
त्यानंतर दापोडी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास महापौर उषा ऊर्फ माई ढोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपमहापौर तुषार हिंगे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थित होते.


















