न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ एप्रिल २०२०) :- देशातील आणि राज्यातील करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालत असून परिस्थिती चिंताजनक होत आहे. राज्यात करोनाग्रस्तांची रुग्णसंख्या दोन हजाराच्या वर गेली आहे. सोमवारी राज्यातील करोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत आज आणखी भर पडली. राज्यात नव्यानं १२१ रुग्णांना करोनाचा संसर्ग झाल्याचं समोर आलं असून एकूण संख्या २ हजार ४५५ इतकी झाली आहे. राज्याच्या आरोग्य विभागानं ही माहिती दिली आहे.
महाराष्ट्राचा विचार केला तर मुंबईत सर्वाधिक रुग्ण आहेत. मुंबईत सर्वतोपरी काळजी घेतली जाते आहे. बाहेर न पडण्याचं आवाहन केलं जातं आहे. आवश्यक असल्यास बाहेर पडलात तर मास्क लावा असंही आवाहन करण्यात आलं आहे. धारावी हा मुंबईतला हॉटस्पॉट आहे. तिथेही प्रादुर्भाव वाढू नये यासाठी काळजी घेतली आहे.


















