- संख्या पोहोचली ४४ वर तर, सक्रीय रुग्णांची संख्या ३१ वर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ एप्रिल २०२०) :- पिंपरी-चिंचवड शहरात मंगळवारी सहा करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यात तीन महिला व तीन पुरुष आहेत. कोरोना बाधित रुग्णांच्या हाय रिस्क कॉन्टॅक्टमधील हे सहा रुग्ण आहेत. त्यामध्ये २९, ३२, ६३ वर्षाचे तीन पुरुष रुग्ण आहेत. तर, ५३, ५४ आणि ५५ वय वर्ष असलेल्या तीन महिला रुग्ण आहेत. हे रुग्ण भोसरी, खराळवाडी, गांधीनगर भागातील आहेत. तर आज बुधवारी एका महिला करोना रुग्णाची त्यात भर पडलेली आहे.
शहरातील करोना बाधितांची संख्या ४४ वर पोहचली असून २७ रुग्णांवर पिंपरी-चिंचवड शहरातील महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. १२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. तर, चार कोरोना बाधित रुग्णांवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रविवारी (दि. ९) एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ३१ वर पोहोचली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना संशयित ५७ जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. तर, आजपर्यंत ४४ पॉझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत.
करोना’ने आता दाट लोकवस्तीत शिरण्यास सुरुवात केली आहे. शहरातील पुनावळे, ताथवडे, भोसरी, पिंपळे सौदागर, मोशी, थेरगाव, खराळवाडी, घरकूल-चिखली, दिघी, दापोडी आणि कासारवाडी परिसरातील दाट वस्तीतील हे पॉझिटीव्ह रुग्ण आहेत. तर, अतिशय दाट लोकवस्ती असलेल्या खराळवाडी परिसरात देखील “करोना’चे आणखी दोन रुग्ण आढळले आहेत.













