न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ एप्रिल २०२०) :- वाल्हेकरवाडी येथे मंगळवारी (ता. १४) रोजी दुपारी साडेतीन वाजता इलेक्ट्रिक डीपीला आग लागली. या डीपीचा स्फोट होऊन आग सर्वत्र पसरली. आगीमुळे शेजारील भंगाराचे साहित्य जाळून खाक झाले.
आगीची माहिती मिळताच अग्निशामक मुख्यालयातून प्रत्येकी एक बंब तात्काळ घटनास्थळी दाखल झाला. नियंत्रण मिळविण्यात अग्निशामक दलास यश आले. मात्र, आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
सुदैवाने या आगीत कोणीही जखमी झालेले नाही. मात्र, चिंचवडेनगर, वाल्हेकरवाडी परिसरातील वीज पुरवठा काही काळ खंडित झाला होता. नागरिक उकाड्यामुळे हैराण झाले होते. काही काळानंतर वीजपुरवठा पुर्वरत झाला.












