न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ एप्रिल २०२०) :- भारतात करोना रुग्णांची संख्या ११ हजार ९३३ वर पोहचली आहे. तर आत्तापर्यंत ३९२ रुग्णांचा मृत्यू झाले आहेत. यापैकी १३४४ रुग्णांना घरी पाठवण्यात आलं आहे. तर १० हजार १९७ रुग्णांवर उपचार सुरु आहे.
भारतात करोनाग्रस्तांची संख्या १२ हजारांच्या जवळ पोहचली आहे. भारताच्या चिंतेत भर घालणारीच ही बातमी आहे. १० हजार १९७ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर ३९२ जणांचा मृत्यू झाला आहे. देशातला लॉकडाउन ३ मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. तर २० एप्रिलपर्यंत लॉकडाउनचे नियम अत्यंत कठोर करण्यात आले आहेत. त्यानंतर कुठे करोनाचे हॉटस्पॉट कमी झाले आहेत किंवा कुठे ग्रीन झोन आहे ते तपासलं जाणार आहे.
देशभरात १७० जिल्हे हे करोनाचे हॉटस्पॉट आहेत. ज्या ठिकाणी करोनाचा शिरकाव झालेला नाही तिथे काही गोष्टी शिथील केल्या जातील मात्र लॉकडाउन कायम असेल असंही आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.
तर महाराष्ट्रात करोनाग्रस्तांची संख्या आता २८०१ झाली आहे. कारण या रुग्णांमध्ये ११७ पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. ११७ मधले १०० रुग्ण मुंबई पुण्यातले आहेत. ११७ पैकी ६६ रुग्ण हे मुंबईतले तर ४४ रुग्ण पुण्यातले आहेत. महाराष्ट्राची काळजी वाढवणारी ही बातमी आहे. महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.


















