- हजार वर्षातून एकदाच घडू शकते अशी घटना; ICMR ची माहिती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ एप्रिल २०२०) :- वटवाघळांमध्ये प्रामुख्यानं करोनाचे विषाणू असतात. परंतु सहसा त्यांचे मानवाकडे संक्रमण होत नाही. परंतु हजार वर्षांमध्ये एकदाच होणारी ही घटना नुकतीच घडली आणि वटवाघळाकडून मानवाकडे कोविड-१९ हा करोना प्रजातीतला विषाणू संक्रमित झाला, अशी माहिती ICMR ने दिली..
वटवाघुळांमध्येही करोना व्हायरस असतो अशी माहिती ICMR अर्थात इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे रामन गंगाखेडकर यांनी दिली. चीनमध्ये झालेल्या एका संशोधनानुसार करोना व्हायरस हा वटवाघुळांमध्येही असतो. हा व्हायरस वटवाघुळांमधून संक्रमित झाला असं म्हटलं जातं. त्यामुळे आम्ही त्याप्रमाणे संशोधन केले. आम्हाला असं आढळून आलं की दोन प्रकारच्या वटवाघुळांमध्ये करोना व्हायरस असतो. मात्र त्याचं संक्रमण माणसाकडे होत नाही. तो वटवाघुळांमध्येच संक्रमित होऊ शकतो. वटवाघुळांमधून माणसाकडे करोना संक्रमित होणं ही घटना हजार वर्षात एखादी घडू शकते असंही त्यांनी स्पष्ट केलं.
ICMR चे रामन गंगाखेडकर यांना वटवाघुळांमुळे करोना पसरतो का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना हा व्हायरस दोन प्रकारांच्या वटवाघुळांमध्ये आढळतो. मात्र तो वटवाघुळांमधून माणसांमध्ये संक्रमित होत नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. वटवाघुळातून माणसात करोना संक्रमित होण्याची शक्यता १ हजार वर्षात एखादी घडते असंही त्यांनी म्हटलं आहे.


















