न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवड :- आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प तयार करण्यास पिंपरी-चिंचवड महापालिकेने सुरवात केली असून, महापालिकेच्या अर्थसंकल्पात नागरिकांचा सहभाग वाढावा, याकरीता या अर्थसंकल्पासाठी नागरिकांनी दहा लाखांपर्यंतच्या खर्चाची कामे सुचवावीत, असे आवाहन केले आहे.
क्षेत्रीय कार्यालयात लेखी अर्जाद्वारे कामे सुचविता येतील. आलेल्या योग्य सूचनांचा समावेश पुढील आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात केला जाणार आहे.
यात कचरापेटीची व्यवस्था, पदपथ तयार करणे, रस्त्यांचे डांबरीकरण, दिवे लावणे, सिग्नल बसविणे, बसस्थानक उभारणे, सार्वजनिक शौचालय उभारणे, वृध्दांसाठी बैठक व्यवस्था करणे, बागा किंवा उद्यानातील सुधारणा आदी कामांबाबत नागरिक सूचना करु शकतात.
त्यासाठी आठ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये तसेच महापालिकेच्या संकेतस्थळावर अर्ज उपलब्ध करुन दिले जाणार आहेत.