- जयंत शिंदे यांचे बांधकाम महामंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ एप्रिल २०२०) :- भारतात महाराष्ट्र हे प्रगतिपथावरील राज्य आहे. यात फार मोठा वाटा स्थानिक कामगाराचा आहे, तसाच परप्रांतिय कामगारांचाही देखील आहे. हे परप्रांतिय कामगार केवळ आपल्या परिवाराच्या पोटाची खळगी भरण्यासाठी इथे महाराष्ट्रात आले आहेत. कोरोनामुळे देशात आणि पिंपरी चिंचवड शहरात लॉकडाऊन लागू झाल्यामुळे आज या परप्रांतीय कामगारांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. ठेकेदार आणि बांधकाम व्यवसायिक एकमेकांकडे बोट दाखवून यांची दिशाभूल करित आहेत. केंद्र सरकारकडून पेकेज जाहीर होऊन, आज जवळजवळ महीना उलटत आला, पण अजूनही बांधकाम कामगारांच्या खात्यात अजून एक पैसा पडलेला नाही. केंद्र सरकारने ०३ मे नंतरही लॉकडाउन वाढविल्यास परिस्थती पुन्हा एकदा गंभीर होऊ शकते. त्यामुळे शासनाने तत्काळ या बांधकाम कामगारांच्या खात्यावर आर्थिक मदत जमा करावी, अशी मागणी बांधकाम कामगार सेनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयंत शिंदे यांनी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीरंगम यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
जयंत शिंदे यांनी श्रीरंगम यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोना आजाराचे संकट आणखीनच गंभीर होत असल्याने केंद्र सरकार व राज्य सरकारने लॉकडाउन वाढविण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत योग्य आहे, असे आम्हाला वाटते व त्यासाठी सर्वप्रथम केंद्र सरकार व राज्य सरकारच्या प्रति आम्ही आभार व्यक्त करतो. पण त्याचप्रमाणे एक गोष्ट अत्यंत खेदाने नमूद करावी वाटते की, महाराष्ट्रातील असंघटीत कामगार आजच्या घडीला सरकारच्या प्रत्येक आदेशाचे पालन करीत असताना, त्या कामगारावर तसेच त्याच्या परिवारावर उपासमारीची वेळ येऊ न देणं ही शासनाची जबाबदारी नाही का? महाराष्ट्र आज देशामध्ये प्रगतिपथावर आहे. यात फार मोठा वाटा जसा स्थानिक कामगाराचा आहे. तसाच परप्रांतिय कामगारांचाही आहे. हे परप्रांतिय कामगार केवळ आपल्या परिवाराच्या पोटाची खळगी भरण्यासाठी इथे महाराष्ट्रात आले आहेत, असेही शिंदे यांनी म्हटले आहे.
लॉकडाऊन जाहीर होण्यापूर्वीच काही दिवस अगोदरच जिल्हयामधील सर्व बांधकामे बंद पडलेली आहेत. कामे चालू असल्यामुळे आज हया परप्रांतीय कामगारांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. ठेकेदार आणि बांधकाम व्यवसायिक एकमेकांकडे बोट दाखवून यांची दिशाभूल करित आहेत. ज्याकरीता केंद्र सरकारकडून पेकेज जाहीर होऊन आज जवळजवळ महीना उलटत आलाय पण अजूनही बांधकाम कामगाराच्या खात्यात अजूनही एक पैसा पडलेला नाही, असेही शिंदे यांनी म्हटले आहे.
आम्ही आमच्या बांधकाम कामगार सेना संघटने मार्फत गेल्या १३ वर्षापासून या क्षेत्रात कार्यरत असून, त्या कामगारांचे जीवनमान सुधारण्यासाठी प्रयत्न करित आहोत. सध्या स्थलांतरित परप्रांतीयांचा प्रश्न अत्यंत गंभीर होत असताना संघटना यूध्द पातळीवर त्यांना मदत करित आहे. परप्रांतिय कामगारांना दोन वेळचे जेवण पूरविणे, त्याच्या आरोग्यविषयी माहीती घेणे, त्याना औषधोपचारासाठी मदत करणे आणि सध्य स्थितीत ते आहेत त्याच ठिकाणी त्यांचे रहाणे हे त्याच्या स्वता:च्या परिवाराच्या व देशहितासाठी किती गरजेचे आहे, हे पटवून देण्यात निदान आज तरी आम्हाला यश आलेले आहे, असे आम्हाला वाटते, असेही शिंदे यांनी म्हटले आहे.
संघटनेच्या अथक प्रयत्नानंतर आज महाराष्टात बांधकाम मजूरासाठी अटल आहार योजना पुन्हा कार्यान्वित झालेली आहे. त्यामुळे बांधकाम मजूराच्या किमान एक वेळच्या जेवणाची चांगली व्यवस्था झाली आहे. त्याच्या इतर गरजा भागविण्यासाठी त्या बांधकाम मजूराना आर्थिक मदतीची अत्यंत आवश्यकता आहे. सध्यस्थितीत केंद्र सरकारने ०३ मे नंतरही लॉकडाउन वाढविल्यास परिस्थती पुन्हा एकदा गंभीर होऊ शकते. आपण या कामगारांचा आणखीन अंत पाहू नये. त्यांना लवकरात लवकर आर्थिक मदत करावी, असे या निवेदनात जयंत शिंदे यांनी म्हटले आहे.













