न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ एप्रिल २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरातील वायसीएम आणि भोसरी रुग्णालयात कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत. शहरात आजपावतो ११० रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. आज वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल एका महिलेचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
महिलेचे वय ५० वर्षे आहे. काही दिवसांपूर्वी ही महिला वायसीएम रुग्णालयात संशयित म्हणून दाखल झाली होती. मृत झालेली महिला पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील खडकी भागात वास्तव्यात होती. त्यामुळे आता शहरात एकूण मृत कोरोनाग्रस्तांची संख्या पाच वर पोहोचली आहे. आजपावतो पिंपरी चिंचवड शहरातील ३ तर पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील दोन कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे.













