- कोरोनाची आपदा जोवर हटत नाही, तोपर्यंत माझे कार्य असेच चालू राहील – डॉ. संतोष बारणे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ एप्रिल २०२०) :- कोरोना या भयंकर विषाणु संसर्गाच्या आपात्कालीन परिस्थितीमध्ये गेले काही दिवस दररोज जमेल तेवढ्या लोकांसाठी आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली डाॅ. संतोष बारणे युवा मंचच्या वतीने अनेक गरजू लोकांना रात्रीचे जेवण, रेशन, भाजीपाला वाटप करण्यात येत आहे. या सेवाकार्याची दखल शासनाने घेतली आहे. याबाबत पिंपरी चिंचवड़ अपर तहसील कार्यालय, आणि अपर तहसीलदार गीता गायकवाड यांच्या हस्ते डाॅ. संतोष बारणे यांच्या कर्त्यम फाउंडेशनला सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.
डॉ. संतोष बारणे यांच्या कार्याचा गौरव करताना अपर तहसीलदार म्हणाल्या की, पुणे व पिंपरी चिंचवड परिसरात दिनांक. ११ / ३ / २०२० पासून सुरु झालेल्या कोरोना ( कोवीड – १९ ) विषाणू संसर्गाच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये आपण अपर तहसिल, पिंपरी चिंचवड कार्यालयाचे माध्यमातून / सहकार्याने स्थानिक व परराज्यातील स्थलांतरित असलेल्या गोर-गरीब, निराधार व गरजू मजूर व्यक्तींना जीवनावश्यक वस्तूंचे सढळ हाताने मदत केलेबाबत व नियोजनबध्द पध्दतीने वाटप करणेकामी या कार्यालयाशी संपर्कात राहून सामाजिक कार्यास योगदान दिलेले आहे. त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून हे सन्मानपत्र आपणांस देणेत येत आहे. यापुढेही आपण आपत्ती कालावधीत प्रशासनास सहकार्य करावे. आपणांस पुढील वाटचालीस महसूल प्रशासनामार्फत सस्नेह सदिच्छा देत आहोत.
डॉ. संतोष बारणे म्हणाले की, कोरोना विषाणूमुळे पिंपरी चिंचवड शहरात भीतीचे वातावरण झाले आहे. कामानिमित्त स्थलांतर केलेले परप्रांतीय मजूर तसेच राज्यातील विविध जिल्ह्यातील गोरगरीब जनता शहरात कसेबसे काबाडकष्ट करून आपली उपजीविका भागवत होती. मात्र, कोरोनामुळे त्यांचा आधारच हारपला. अशा गोरगरीब लोकांसाठी आमदार महेशदादांच्या मार्गदर्शनाखाली रात्रीचे जेवण, रेशन, भाजीपाला वाटप करण्यात येत आहे. तसेच ही आपदा जोवर हटत नाही, तोपर्यंत माझे कार्य असेच चालू राहील. शासनाने माझ्या कार्याची दखल घेऊन मला सन्मानित केले त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो.













