- शेजा-याकडून अन्न देता-घेतांना काळजी घेण्याचे महापालिका आयुक्तांचे आवाहन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ एप्रिल २०२०) :- कायमस्वरूपी स्वत:ची काळजी घेवून अंतर्गत मान ठेवून कोरोना सोबत जगायला हवे, मास्कचा वापर केला तर कोरोना संसर्ग होण्याचा ६० टक्के धोका टळू शकतो. सामाजिक अंतर ठेवून काम करा, असे आवाहन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकच्या वतीने आज कोरोना कोविड – १९ चा प्रसार रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपायोजनाची माहिती ‘कोरोना समवेत जगतांना’ या फेसबुक लाईव्हसिरीजद्वारे देतांना सामाजिक अंतर ( social distancing ) या विषयावर ते आज नागरीकांशी संवाद साधतांना बोलत होते.
आपण कोरोना सोबत जगत आहोत याचे अंतरीक भान कायम स्वरूपात ठेवणे आवश्यक आहे. हे भान नसेल तर आपण बेसावध असतांना कोरोना विषाणू आपल्याला बाधा करू शकतो असही ते म्हणाले. रोजचे जीवनात काळजी घेतली तर आपण स्वत: वाचू शकतो व कुटंबीयांचेही संरक्षण करू शकतो. कोरोना बरोबर जगतांना या मालिकेच्या आज दूस-या भागाचे प्रारंभी त्यांनी नागरीकांनी विचारलेल्या प्रश्नांबाबत खुलासा केला.
ते म्हणाले, टेस्टींग किट मर्यादित उपलब्ध असलेने सर्वांचीच आपण तपासणी करू शकत नाही. परंतु जे पॉझीटीव्ह रुग्णांचे हाय रिस्क कॉन्टेक्ट आले आहेत किंवा ज्यांना श्वासाचा त्रास होतो. सर्दी, ताप, खोकला याचा त्रास आहे, असे रुग्णांची प्राधान्याने तपासणी करण्यात येत आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय हे आता पूर्ण करोना रुग्णांसाठी राखून ठेवण्यात आले आहे. म्हणून इतर आजार किंवा शस्त्रक्रिया साठी नागरीकांनी डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पीटलमध्ये सुविधा केली असून नागरीकांनी त्याचा उपयोग करावा, असेही ते म्हणाले.
प्रामुख्याने गरोदर महिलांनी या दवाखान्यात इलाज करून घ्यावा असेही ते म्हणाले. जे नागरीक इतर ठिकाणी अडकले आहेत किंवा इतर राज्यातील लोक या शहरात अडकले आहेत त्याबाबत नागरीक शंका विचारत असतांना अडकलेल्या नागरीकांना आपापले ठिकाणी जाणे हे अपवादात्मक परिस्थितीत अशक्यच आहे. तर खूपच महत्वाचे काम असेल व स्वत: चे वाहन असेल तर पोलीसांची पूर्व परवानगीने जाता येणे शक्य असल्याचेही ते म्हणाले.
येत्या ३ मे नंतर लॉकडॉउन उघडल्यानंतर कोणते उद्योग सुरू करावेत याबाबत राज्य शासन किंवा केंद्र शासनाकडून आदेश प्राप्त झाले नाहीत, तथापी उद्योग व्यवसाय सुरू करण्याची वेळ आली तर मोठया प्रमाणात खबरदारी बाळगावी लागेल. कारण लॉकडॉऊन उठला तरी कोरोना गेलेला नाही याचे भान ठेवून आपल्याला या आजारापासून बचाव करणे शक्य आहे. कोरोना आपल्या उंबरठ्यावर आहे. त्याला आपल्या घरात प्रवेश करू द्यायचे नसेल तर आपल्याला सामाजिक अंतर ( सोशल डिस्टन्स ) पाळणे गरजेचे आहे.
ज्या लोकांना घराबाहेर पडावे लागते ते अधिकारी, दवाखान्यातील डॉक्टर, कर्मचारी आरोग्य विभागाचे कर्मचारी, पोलीस, जीवनावश्यक वस्तू पूरवठाधारक यांनी सामाजिक अंतर राखून काळजी घेणे आवश्यक आहे. सर्वसामान्य नागरीकांनी आपले जीवनात थोडे बदल करणे आवश्यक आहे. घरातून अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये. हे बंधन प्रत्येकाने पाळणे गरजेचे आहे. अत्यावश्यक गोष्टीसाठी बाहेर पडावे, एका वेळेस एकानेच बाहेर जावे, दिलेल्या वेळत बाहेर पडून आपले काम उरकावे तथापी फेरफटका मारण्याची ही वेळ नाही, याचे भान प्रत्येक नागरीकाने ठेवावे, असेही ते म्हणाले.
त्याचबरोबर मास्क वापरणे हे गरजेचे आहे. कोरोनाचा संसर्ग यामुळे ६० टक्के प्रमाणात टळू शकतो, जेव्हा दोन व्यक्ती समोरासमोर येतात व बोलतात किंवा शिंकतात कोरोनाचे विषाणू आजूबाजूचे क्षेत्रात विखुरले जातात. त्यामुळे दोन व्यक्तीमध्ये एक मिटरचे अंतर आवश्यक आहे. हे सामाजिक अंतर ठेवण्यासाठी व संसर्ग टाळण्यासाठी शाळा, चित्रपटगृहे, रेल्वे व बस सेवा, यावर बंदी असल्याचे त्यांनी सांगीतले. आपण सामाजिक अंतर ठेवल्यामुळे आजाराचा प्रादूर्भाव रोखण्यास मदत झाली आहे. आता आपण एकमेकांना भेटत असताना अभिवादन करण्याच्या पध्दतीत सध्या बदल करणे अपेक्षित आहे. आपल्या संस्कृतीने घालून दिलेल्या आदर्श सांभाळणे गरजचे आहे. हात मिळवणे, गळा भेट न घेता नमस्कार करणे, हात जोडणे, वाकून नमस्कार करणे या गोष्टी आवश्यक आहे. आपल्या दैनंदिन आचरणात बदल करण्याचे आवाहन आयुक्त हर्डीकर यांनी केले.
शेजा-याकडून अन्न देता-घेतांना काळजी घेणे आवश्यक आहे. सार्वजनिक शौचालयाचे ठिकाणीही काळजी घेणे आवश्यक आहे. हाताची स्वच्छता राखण्यासाठी साबन लावून बोटाचे मधील भाग घासून २० सेकंदापर्यत धुवावे व हात मनगटापर्यंत धुणे आवश्यक आहे. साबन वापरणे शक्य नसल्यास सेनीटायझरचा वापर केला पाहिजे. आपण ज्या सार्वजनिक ठिकाणी जातो तेथील निर्जतुकीकरणाची आवश्यकता आहे. पृष्टभागावर आपले हात ठेवले जाऊ शकतात तेथील निर्जतुकीकरण करणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले. रुग्णालय किंवा कोरोना पॉझीटीव्ह रूग्ण ज्या ठिकाणी आढळले आहेत ते ठिकाण सोडीअम हायपोक्लोराईट द्रावणाचे वापर करून निर्जतुक करणे महानगरपालिके मार्फत केले जात आहे. इतर ठिकाणी इतर औषधांनी निर्जतुकीकरण केले तरी चालू शकतो. पॉझीटीव रूग्ण, सोसायटी कॉमन एरिया, रेलींग, लिफ्ट बटन, गाडीचे हँडल, दरवाज्याचे हूक, टेबलाचा पृष्टभाग इत्यादी निर्जतुकीकरण करणे आवश्यक आहे. आपण कोरोना सोबत जगत आहोत याचे कायम स्वरूपी भान असणे आवश्यक आहे. आपण घरी जात असतांना हात निर्जतुक करून घरात जायला पाहिजे. त्याच बरोबर घरात जाऊन थेट बाथरूममध्ये जाऊन कपडे गरम पाण्यात धुवुन ध्यावे व आंघोळ करावी. त्यामुळे आपल्या कुटुंबाचे संरक्षण करू शकता.
पिंपरी चिंचवड शहराचे सर्वच भागात निर्जंतुकीकरण करणे आवश्यक नाही तथापी जेथे कोरोना पॉझीटीव्ह रूग्ण आहेत तेथे मनपाचे वतीने निर्जतुकीकरण केले जात आहे. आपले नजीकचे दवाखाना, निवारा केंद्र, अन्न वाटप केंद्र, किराणा दुकान, औषध दुकाने याची माहिती स्मार्ट सारथी ऍपवर नागरीकांना उपलब्ध करून दिली असून मनपाने विकसीत केलेल्या या ऍपचा वापर सर्वानी करावा, असे आवाहनही आयुक्त हर्डीकर यांनी केले.













