न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ एप्रिल २०२०) :- पिंपरी चिंचवड पोलिसांनी समीर शेख (वय २१, रा. लक्ष्मणनगर, थेरगाव) याला दोन वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार केले होते. त्याचा तडीपारीचा कालावधी संपण्याच्या अगोदर तो शहरात आला.
मंगळवारी (दि. २८) त्याने आपल्या सोबत लोखंडी कोयता बाळगून गुजरनगर, थेरगाव येथील दुकानदारांना शिवीगाळ करत धमकी देऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
वाकड पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्यावर गुन्हा नोंदविला आहे. आरोपीकडून पोलिसांनी एक दुचाकी आणि लोखंडी कोयता असा एकूण २५ हजार १५० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.












