न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ मे २०२०) :- जगभरात थैमान घालणाऱ्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव देशात दिवसेंदिवस वाढत आहे. करोनाबाधितांची देशातील एकूण संख्या ४९ हजार ३९१ वर पोहचली आहे.
यामध्ये सध्या उपचार सुरू असलेले ३३ हजार ५१४ रुग्ण, रुग्णालयातून उपचारानंतर सुट्टी देण्यात आलेले १४ हजार १८२ जण व एक स्थलांतरित तसेच आतापर्यंत मृत्यू झालेल्या १ हजार ६९४ जणांचा समावेश आहे.


















