न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ मे २०२०) :- भोसरीतील कै. सौ. इंदुबाई विठोबा लांडे (वय:-९३) यांचे आज बुधवारी (दि. ६) रोजी दुःखद निधन झाले. त्यांचा अत्यंविधी आज दि.०६/०५/२०२० सकाळी १० वाजता भोसरी येथे संपन्न झाला.
त्यांच्या जाण्याने भोसरी व पंचक्रोशीतील परिसरातील ग्रामस्थांनी शोक व्यक्त केला आहे. त्या भोसरी विधानसभेचे माजी आमदार विलास विठोबा लांडे, माजी नगरसेवक विश्वनाथ विठोबा लांडे यांच्या मातोश्री होत.


















