न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ मे २०२०) :- करोनामुळे उभ्या आर्थिक संकटामुळे पदभरती न करण्याचा निर्णय राज्य सरकारने नुकताच घेतला आहे. मात्र, आम्ही विनावेतन काम करायला तयार आहोत, पण पदभरतीवर बंदी घालू नका अशी मागणी एमपीएससी समन्वय समितीकडून करण्यात आली आहे.
एमपीएससी समन्वय समितीचे राहुल कवठेकर, पद्माकर होळंबे, जितेंद्र तोरडमल, महेश घरबुडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन दिले आहे. ‘पदभरती न करण्याचा निर्णय अन्यायकारक आहे. बेरोजगारी वाढलेली असताना अशा निर्णयामुळे बेरोजगारी आणखी वाढत आहे.
राज्य संकटात आहे, तसे आम्हीही संकटात आहोत. आम्हाला पगार नको. राज्य आर्थिक संकटात आहे, तोवर आम्हाला पगार देऊ नका. पण आम्हाला नोकऱ्या द्या. पद भरती बंदी न करता जास्तीत जास्त नोकऱ्या उपलब्ध करून द्या. पद भरती बंदीचा निर्णय रद्द करावा, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.


















