न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ मे २०२०) :- पुणे जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्र वगळता सर्व भागांमध्ये आता पेट्रोल-डिझेलचा पूर्वीसारखाच पुरवठा करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
सुधारित आदेशानुसार, पुणे जिल्ह्यातील पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, खडकी व देहूरोड छावणी, नगरपरिषद, नगरपालिका, नगरपंचायत आणि पुणे ग्रामीण क्षेत्रातील प्रतिबंधित क्षेत्र वगळून इतर सर्व क्षेत्रांमध्ये पेट्रोल-डिझेल पंप चालकांनी येणाऱ्या सर्व वाहनांना ओळखपत्राची मागणी न करता सकाळी ७ ते सायंकाळी ७ या वेळेमध्ये पेट्रोल-डिझेलचा पुरवठा करावा, असे म्हटले आहे.
त्यामुळे जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आता आपल्या वाहनांसाठी पेट्रोल-डिझेल मिळू शकणार आहे. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी याबाबत सुधारित आदेश जारी केला आहे.


















