- मोशी, मोहननगर, चिखली, काळेवाडी परिसर आज मध्यरात्री सील…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ मे २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. आज बुधवारी सायंकाळी आलेल्या अहवालात मोशी, मोहननगर परिसरातील तीन पुरुषांना कोरोनाची लागण झालेली आहे. तसेच पुण्यातील येरवडा परिसरातील एका ४८ वर्षीय महिलेला देखील कोरोनाची लागण झालेली आहे.
पुरुषांची वय अनुक्रमे ३३, ३३ व ५२ अशी आहेत. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १४५ वर पोहोचली आहे. तसेच महापालिकेच्या रुग्णालयात ७३ रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत.
तसेच पुण्यातील सिंहगड रोड परिसरातील एका पुरुषाची दोन्ही वेळची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना आज घरी सोडण्यात आलेले आहे.
दरम्यान वुड्सव्हिले, मोशी येथील (वुड्सव्हिले सोसायटी बॉर्डर – वुड्सव्हिले सोसायटी बॉर्डर – वूड्सव्हिले रोड – वुड्सव्हिले ऑफिस – साई फेब्रोटेक – हॉटेल शेअरिंग स्पून – आर्या हॉस्पिटल – डीपी रोड – वुडसव्हिले सोसायटी बॉर्डर)
मोहननगर, चिंचवड येथील ( श्रीराम सुपर मार्केट – श्रीराम मेडिकल शॉप – श्रीराम चौक – टाटा मोटर्स सहींसिंग मेंटर – वसंत इंडस्ट्रीज –
चिखली कस्पटे वस्ती बीआरटी टेल्को रोड – जम्बों किंग हॉटेल – एचडीएफसी बैंक ए . टी . एम . राष्ट्रमाता जिजाऊ मंगल कार्यालय – श्रीराम सुपर मार्केट) काळेवाडी येथील ( काळेवाडी फाटा – भारत गॅस – सेंट अल्फोन्सो स्कुल – फेडरल बैंक मदर टेरेसा फ्लायओव्हर पवना नदी – काळेवाडी पिंपरी पुल-सेवा विकास को. ऑ. बैंक – पोलिस चौक – काळेवाडी फाटा परिसर आज मध्यरात्री ११. ०० वाजलेपासून पुढील आदेशापर्यंत सील करण्यात येत आहे.
सदर परिसराच्या हद्दींमध्ये पुढील आदेशापर्यंत प्रवेशबंदी व परिसरातून बाहेर पडण्यास नागरिकांना बंदी केलेली आहे. सील केलेल्या परिसरातील प्रत्येक नागरिकाने तोंडाला मास्क लावणे बंधनकारक आहे.


















