न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि ७ मे २०२०) :- कासारवाडी परिसरात भटकत राहणाऱ्या श्वानाच्या गळ्यात नायलॉन आणि कापडी दोरी बांधून त्याला दुचाकीच्या मागे बांधले. त्या श्वानाला दुचाकीला बांधून कासारवाडी स्मशानभूमी पासून ते किनारा हॉटेलपर्यंत ओढत फरफटत नेले. रस्त्यावरून फरफटल्यामुळे गंभीर जखमी होऊन श्वानाचा मृत्यू झाला.
ही घटना मंगळवारी (दि. ५) रोजी सकाळी कासारवाडी येथे घडली. बंटी फुगे (वय २५, रा. कासारवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी एका महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सबंधित तरुणावर गुन्हा दाखल झाला आहे


















