न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि ७ मे २०२०) :- लॉकडाउनमुळे गोरगरीब नागरिकांच्या हाताला काम नाही. त्यामुळे त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला होता. शिवसेना गटनेते राहुल कलाटे त्यांच्या मदतीला धावून आले आहेत. कलाटे यांच्यावतीने वाकड भागातील गरजु व गोरगरीबांना अन्नधान्याच्या किटचे वाटप केले जात आहे.
गहू, तांदूळ, तेल, मीठ, हळद, मसाल्याचा समावेश असलेल्या अशा सुमारे सात हजारहून अधिक किटचे आजपर्यंत वाटप करण्यात आले आहे. याबाबत राहुल कलाटे म्हणाले, ‘लॉकडाउनमुळे अनेक गोरगरीबांचा रोजगार गेला आहे त्यामुळे नागरिकांच्या एकवेळची देखील जेवण्याची व्यवस्था होत नाही. त्यासाठी मागील काही दिवसांपासून वाकड भागातील गरजू आणि गरीब नागरिकांना अन्नधान्याच्या किटचे वाटप करीत आहे’.















