न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ मे २०२०) :- कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर दीड ते दोन महिन्यापासून बंद असलेला लाँन्ड्री व्यवसाय अजूनही पूर्वपदावर आलेला नाही व सुरू झालेला नाही. हा समाज अत्यंत गरीब असून कारागीर व लाँन्ड्री मालकांचे उपासमार होत आहे.
संसारी वस्तू व आर्थिक नियोजन पूर्णपणे कोलमडलेले असून, कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत त्यांना राज्य सरकारकडून मिळालेली नाही. कर्नाटक सरकारने पाच हजार रुपयांची आर्थिक मदत प्रत्येकी लाँन्ड्री चालक व मालक यांना जाहीर केली आहे.
त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने असाच निर्णय घेऊन समाजाला न्याय द्यावा, अशी मागणी राज्य सरकारकडे केली आहे, अशी माहिती पिंपरी चिंचवड शहर लाँन्ड्री संघटनेचे संस्थापक, कार्याध्यक्ष विशाल जाधव यांनी दिली.















