न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ मे २०२०) :- टाळेबंदीमुळे गेल्या दीड महिन्यांपासून जीवनावश्यक वस्तू, किराणा माल वगळता अन्य दुकाने बंद असल्याने नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी प्रतिबंधित क्षेत्र वगळता शहराच्या अन्य भागातील दुकाने खुली ठेवण्याची मुभा दिली. गुरुवारी (७ मे) रोजी किराणा माल, किरकोळ साहित्य, दूध डेअरी अशी दुकाने दुपापर्यंत खुली राहिली.
काही दुकानचालकांनी महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयात नाव नोंदणी केली. महापालिका आयुक्तांनी रस्ता अथवा गल्लीमध्ये जास्तीज जास्त पाच दुकाने खुली करण्याची परवानगी दिली आहे.
त्यानुसार शहरातील गैरेज, बेकरी, चष्मा, लहान मुलांचे कपडे आणि इलेक्ट्रॉनिक्स साहित्याची काही दुकाने उघडण्यात आली होती. मात्र, गर्दी होत असलेल्या ठिकाणी परवानगी न देण्यात आल्याने त्या भागातील दुकाने बंदच होती. दुपारनंतर ग्राहक नसल्याने काही दुकाने बंद करण्यात आली.















