न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ मे २०२०) :- आम्ही हे ठरवलं आहे की महाराष्ट्रात जे स्थलांतरित मजूर आहेत त्यांना त्यांच्या परराज्यातील गावी जायचं असेल तर आधी डॉक्टरकडून आरोग्य प्रमाणपत्र घ्यावं लागत असे. त्यासाठी गावाला जाण्याआधी त्यांना डॉक्टरच्या दवाखान्याबाहेर रांग लावावी लागत असे.
हे टाळण्यासाठीच आम्ही हा निर्णय घेतला आहे. ज्या मजुरांना गावी जायचं आहे त्यांना या प्रमाणपत्राची आवश्यकता भासणार नाही. ज्या मजुरांना गावी जायचं आहे त्यांचं थर्मल चेकिंग केलं जाईल. ताप आहे की नाही हे पाहिलं जाईल, ताप नसेल तर लगेचच या मजुरांना पुढे पाठवलं जाईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.















