न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ मे २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरातील महापालिकेच्या रुग्णालयात दाखल संशियत रुग्णांपैकी आज शुक्रवारी सकाळी आणखी तिघांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. यात एका २९ वर्षीय पुरुषाचा तसेच ३३ वर्षीय महिलेचा व एका ७५ वर्षीय वृद्धेचा समावेश आहे.
त्यामुळे शहरात १५४ रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर ८० रुग्ण महापालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहेत. आज चाचणी अहवाल सकारात्मक (पॉझिटीव्ह) आलेले रुग्ण चिखलीतील ताम्हाणे वस्ती तसेच मोशी येथील रहिवासी आहेत.















