- महापालिकेने कोरोनाबाबत केलेल्या कामांचा घेतला आढावा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ मे. २०२०) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने कोरोना कोविड – १९ चा संसर्ग रोखण्यासाठी सुरू असलेल्या उपायोजना व कोविड – १९ वॉर रूमची पाहणी राज्याचे नगरविकास खात्याचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी भेट देवून केली. यावेळी आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी कोविड – १९ वॉररूम अंतर्गत सूरू असलेल्या कामकाजाची माहिती त्यांना दिली. पिंपरी चिंचवड महानगरपालिका परिसरातील सध्यस्थीतील कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनाची माहिती आयुक्त हर्डीकर यांनी प्रधान सचिव महेश पाठक यांना दिली. यशवंतराव चव्हाण रुग्णालय हे पूर्णपणे कोरोनासाठी राखीव ठेवण्यात आले असून, इतर रुग्णांना डॉ . डी वाय पाटील हॉस्पिटल मध्ये उपचाराची सोय करण्यात आल्याचेही आयुक्त हर्डीकर यांनी सांगितले.
पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले तर त्यांचे संपर्कात आलेल्या नागरिकांचा शोध घेऊन वैद्यकीय पथकामार्फत त्यांची तपासणीची कार्यवाही करण्यात येते. या साठी यशवंतराव चव्हाण रुग्णालय व भोसरी रुग्णालग येथे कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यात येत आहे, अशीही माहिती आयुक्त हर्डीकर यांनी यावेळी प्रधान सचिव पाठक यांना दिली.
नागरिकांचा कोरोना संसर्गापासून बचाव करण्यासाठी मास्क वापरणे, हात स्वच्छ धुणे, सोशल डिस्टन्स चा अवलंब करणे या बाबींबाबत दक्षता घ्यावी व तसे नागरिकांना प्रोत्साहन करावे, अशी सूचना प्रधान सचिव महेश पाठक यांनी आयुक्त यांना दिली.
पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने नागरीकांचे सोयीसाठी सारथी अॅप केले असून त्याद्वारेही माहिती घेण्यात येत असल्याचे तसेच नागरिकांनी स्मार्ट सारथी ऍप चे माध्यमातून विविध प्रकारची माहिती घरी बसल्या मिळत आहे. तसेच केंद्र सरकारने विकसीत केलेल्या आरोग्य सेतू ऍप डाउनलोड करण्याबाबत नागरीकांना अवाहन करण्यात आल्याची माहिती आयुक्त हर्डीकर यांनी दिली.
यावेळी अतिरीक्त आयुक्त संतोष पाटील, अजित पवार, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, सहय्यक आयुक्त अण्णा बोदडे इत्यादी उपस्थित होते.


















