- आज मोशी, इंदिरानगरमधील दोनजण कोरोनामुक्त…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ मे. २०२०) :- पिंपरी चिंचवडमध्ये आज सोमवारी सायंकाळी आलेल्या अहवालानुसार शहरात एकही कोरोनाग्रस्त रुग्ण आढळला नाही. मात्र, पुण्यातील नानापेठ व कसबापेठ परिसरातील एका ५५ वर्षीय पुरुषाला व ३५ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. हे रुग्ण महापालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत आहेत.
दरम्यान रविवारी आढळलेला कोरोनाबाधित रुग्ण हा शहराच्या हद्दीमधील नसून पुण्यातील आहे. त्यामुळे शहरातील कोरोनाग्रतांची संख्या एकने घटून १६८ वर स्थिर आहे. तर महापालिकेच्या रुग्णालयात ४६ रुग्ण उपचार घेत आहेत.
तसेच आज मोशी, इंदिरानगर येथील रहिवासी असलेले दोन कोविड – १९ बाधित रुग्ण महापालिकेच्या रुग्णालयात दाखल होते. त्यांना आज घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १०९ वर पोहोचली आहे.