- जुनी सांगवीतील बुध्दघोष सोसायटी व आकुर्डीतील शुभश्री हौसिंग सोसायटी परिसर सील…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ मे २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात आज सायंकाळी कोरोनाने विसावा घेतल्याचे चित्र आहे. आज सायंकाळी आलेल्या अहवालात शहरातील एकालाही कोरोनाची लागण झाली झाली नाही. दरम्यान कोरोनाग्रस्तांची संख्या १८३ वर स्थिर असून, ५७ रुग्ण महापालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत ११६ रुग्ण कोरोनामुक्त झालेले आहेत. तर शहरातील चार जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.
तसेच आज जुनी सांगवीतील बुध्दघोष सोसायटी (न्यु युनीटी मेडिकेअर – जयराज रेसिडन्सी फेज १ – गणेश बेकरी – वाघमारे रोड – हर्षल इलेक्ट्रीकल्स – शिवगंगा कॉम्प्लेकमा युनीटी मेडिकेअर),
आकुर्डीतील (शुभश्री हौसिंग सोसायटी – जय गणेश हॉटेल – मदिना मशीद – सद्गुरु अपार्टमेंट – आकुर्डी मेन रोड खंडोबा माळ चौक – आयनॉक्स रोड – जय गणेश व्हिजन – हॉटेल आंगण – शुभश्री हाऊसिंग सोसायटी) परिसर आज मध्यरात्री ११.०० वाजलेपासून सील करण्यात येत आहे. सदर परिसराच्या हद्दीमध्ये पुढील आदेशापर्यंत प्रवेशबंदी व परिसरातून बाहेर पडण्यास नागरिकांना बंदी केलेली आहे. सील केलेल्या परिसरातील प्रत्येक नागरिकाने तोंडाला मास्क लावणे बंधनकारक आहे.


















